क्राइमब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी:शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी ची कारवाई..

अलिबागमधील ८ भूखंड आणि मुंबईतील एका फ्लॅट केला जप्त

मुंबई:शिवसेना प्रवक्ते व खासदार  संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील दादर येथील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा   सामना रंगताना पाहायला मिळत होता. याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे

मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान कसलीही नोटीस न देता ईडीकडून सुडाची कारवाई केली गेली आहे ,पण मी घाबरणार नाही;आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, पण आता तुमची कबर खणायला सुरवात केली आहे- अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!