कोंकण

रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इन्फोसिस सोबत सामंजस्य करार होणार-मंत्री उदय सामंत

रत्नागिरी:आगामी शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुफ होत आहे. 300 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयात रोजगारक्षम शिक्षण मिळावे या करिता तंत्रज्ञानात अग्रगण्या असणाऱ्या इन्फोसिस सोबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे महाविद्यालयास 5 अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजूरी मिळालेली आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांना एकत्र करुन मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीला येथे सुरुवात होईल. ऑटोमोबाईल क्षेत्रात या अभियंत्यांना मोठी मागणी आगामी काळात राहणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता 60 असेल.

तसेच सिव्हील आणि इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी यांच्यासह आर्टीफिशिअल इन्टेलिजन्स व डेटा सायन्स अभियांत्रिकी व फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या शाखांना प्रत्येकी 60 याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान मिळावे यासाठी इन्फोसिस या कंपनीसह स्प्रींगबोर्ड या शैक्षणिक संस्थेसोबत सामंजस्य करार करुन अधिक अनुभव ग्रहण करता येणार आहे. इन्फोसीस तर्फे या विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व तसेच Artificial Intelligence and Data science या नवीन व अद्यावत technologyजवळपास 3200 वेगवेगळे कोर्सेस/ट्रेनिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध्‍ा होणार आहेत.

Springboard वरील वेगवेगळय कोर्सेसद्वारे विद्यार्थ्यांना Infosys या कंपनीमार्फत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे Industry expert चे मार्गदर्शन मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना IT and ITes या क्षेत्रातील वेगवेगळे Industrial Projects वर काम करण्याची संधी मिळणार असून त्याद्वारे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी चे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम होतील. विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी व त्यादृष्टीने घ्यावयाचे प्रशिक्षण याबाबत ndustry expert कडून मार्गदर्शन मिळेल.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी या संस्थेतील शिक्षकांना latest advanced courses in AI and DS, IT, Computer Engineering, IOT etc. या विषयातील प्रशिक्षण Infosys मार्फत उपलब्ध होणार असून त्यांना Infosys च्या तज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळेल. ज्याद्वारे वेगवेगळया विषयातील Content Development करण्यास मदत होईल.

शिक्षकांना Industry मधील Live projects वर काम करण्याची संधी उपलब्ध होईल व यामुळे शिक्षकांचे Industrial training होवू शकेल व त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. Infosys च्या Springboard Education portal वरील professional courses विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येईल व यामुळे विद्यार्थ्यांना more employable होवून नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!