ब्रेकिंग: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक

मुंबई : 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केली. काल अनिल देशमुख स्वतःहून ईडी च्या कार्यालयात दाखल झाले होते. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने रात्री २ वाजता अटक केली.
या पूर्वी ईडीने त्यांना अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र तरीही ते ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा च्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली आणि अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.
अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नव्हते; ईडीचा दावा
अनिल देशमुख सोमवारी सकाळी १०.३० वाजे च्या दरम्यान ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री १२ पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच जवळपास १३ तास त्यांची चौकशी सुरु होती. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. असा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. अखेर रात्री १२ वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला, व Prevention Of Money laundering Act अंतर्गत अटकेची कारवाई केली.