मुंबई
तौत्के चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्याने मुंबई विमानतळावरील सर्व विमानसेवा ४ तासांसाठी स्थगित..
मुंबई,दि.१७: सकाळपासूनच तुफान पाऊस आणि सोसाट्याचा वारा घेऊन आलेल्या तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA)सर्व विमानसेवा आज सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरील कालावधीत कोणत्याही विमानाचे आगमन किंवा प्रस्थान होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ही घोषणा केलेली आहे.





