रत्नागिरीत ‘पाली’ येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त…

रत्नागिरी: गणोशोत्सव तोंडावर येत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत रत्नागिरी तालुक्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे सुमारे ११० बॉक्स जप्त करत तब्बल 13 लाख 44 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडला आहे.
रत्नागिरीत गोवा बनावटी च्या विदेशी मद्याची चोरटी वहातूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी पथकाला मिळाली होती. त्यानुसार काल 25 ऑगस्ट रोजी निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना अशोक लेलॅण्ड कंपनीचे ( दोस्त ) सफेद रंगाचे चारचाकी वाहन (क्र . MH – 09 – EM – 8207) मधून गोवा बनावटी विदेशी मद्याचे 110 बॉक्स अवैधरितीने वहातूक करीत असताना आढळून आले. ते जप्त करण्यात आले.
दरम्यान गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चोरटी दारू पकडली गेल्याने अवैध दारू विक्री करणारया ऊद्योगांचे धाबे दणाणले आहे.