वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणार्याच्या कुटुंबीयांना मिळणार दहा लाख रुपये

रत्नागिरी : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणार्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तसेच हल्ल्यात मृत झालेल्या शेतीउपयुक्त जनावरांसाठी 40 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे.
शेती आणि शेतकरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकर्यांसमोर आणखी संकट उभे ठाकले आहे ते म्हणजे वन्यप्राण्यांपासून होणार्या नुकसानीचे. मानव आणि वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी वनविभागातर्फे नवीन उपक्रम हाती घेतला आहे. आता वन्यप्राण्यांनी मानवावर केलेला हल्ला किंवा शेतमालाची केलेली नुकसान त्यासाठी भरपाई मिळणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणार्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख, तर हल्ल्यात मृत झालेल्या शेती उपयुक्त जनावरांसाठी 40 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे.