पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनेच केली पत्नीची हत्या
राजापूर : पत्नीकडून होणार्या सतत शिवीगाळ व त्रासामुळे कंटाळून पतीनेच आपल्या पत्नीचे नाक व तोंड दाबुन तिचा खुन केल्याची घटना राजापूर तालुक्यातील परुळे सुतारवाडी येथे घडली आहे.
शुक्रवारी २५ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे. सौ. सिध्दी उर्फ विद्या गजानन भोवड (३५ ) असे यातील मयत महिलेचे नाव असल्याची माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी पती गजानन जगन्नाथ भोवड (४० ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलीसांनी अटक केली आहे. पत्नीच्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना वाटेतील जंगलात पत्नी बेसावध असताना पाठीमागून तिला धरून तीचा नाक व गळा दाबून गजानन याने तिचा खून केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.
दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर तिचा पती गजानन जगन्नाथ भोवड याने बनाव करताना अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढीत नेले व तिचा खुन केल्याचे भासवित पोलीसांनाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु संशय आल्याने गजानन यास पोलीसी खाक्या दाखविताच पत्नी सौ. सिध्दी हीचा खुन आपणच केल्याची कबुली त्याने पोलीसांना दिली आहे