महाराष्ट्र

मुंबईत कडक निर्बंध असतानाही चित्रीकरणास परवानगी

पोलीस आणि पालिकेचा उदारपणा

मुंबई : मुंबईत कडक निर्बंध असतानाही मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेने चित्रीकरणास परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वांद्रे पश्चिम येथील पीस हेवन बंगल्यात परवानगी दिली असून रस्ताही व्यापला आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांस पाठविलेल्या लेखी पत्रात चित्रीकरण परवानगीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबईत लॉकडाउन असताना अश्या प्रकारची परवानगी कशी देण्यात आली? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मुंबई पोलिसांनी विंडो सीट फिल्मच्या जितेंद्र सिंह यांस सकाळी 7 ते रात्री 7 अशी परवानगी 25 ते 28 जून तसेच 30 जून ते 2 जुलै या दरम्यान देण्यात आली आहे. सांताक्रूझ एच पूर्व महापालिका वॉर्ड कार्यालयाने तर चक्क जॉगर्स पार्क बाहेर मेकअप व्हॅन, जनरेटर आणि टेंपो यास पार्किंगची परवानगी दिली आहे यामुळे पार्क प्रदूषणयुक्त झाले आहे.
अनिल गलगली यांच्या मते अशी परवानगी देऊन अप्रत्यक्षपणे निर्बंध असतानाही परवानगी देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला हरताळ फासला जात आहे. मुंबईत कडक निर्बंध असतानाही चित्रीकरणास परवानगी कशी दिली जाते, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!