महाराष्ट्र

चित्रपट निर्मात्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना पोलिसांकडून अटक

मुंबई : एका खासदारावर छळ करीत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. डॉक्टरेट पदवी बनावट असल्याचा आरोप पाटकर यांच्यावर आहे. पाटकर यांना आज, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात पीएचडी केलेली नसतानाही स्वप्ना पाटकर यांनी कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालयात या विषयामध्ये पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप तक्रारदार गुरदीप कौर सिंग यांनी केला आहे. 2009 मध्ये मिळविलेल्या या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पाटकर यांनी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळविल्याचेही गुरदीप यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.

गुरदीप यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता पाटकर यांची पदवी बोगस असल्याचा अहवाल विश्व विद्यालयाकडून देण्यात आला. त्यानंतर पाटकर यांच्या विरोधात भादंवि कलम 419, 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक “बाळकडू”ची निर्मिती केली होती. मराठीतील एका आघाडीच्या दैनिकात त्या काही काळ स्तंभलेखनही करीत होत्या. अलीकडेच एका पत्रकार, खासदारावर छळाचा आरोपही त्यांनी केला होता.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!