मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात चोरीच्या निमित्ताने शिरलेल्या चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. वरवर पाहता ही घटना सुरुवातीला आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि त्यानंतर सैफ आणि आरोपीमध्ये झटापटी झाली, या झटापटीत सैफ हा गंभीर जखमी झाल्याचा अंदाज बांधला जात होता. पण ही घटना वाटते तितकी सोपी नाही हे आता स्पष्ट होत आहे. कारण या प्रकरणाबाबत अतिशय धक्कादायक माहिती आता समोर येताना दिसत आहे. सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर ६ वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते. जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याचे दिसून येते. त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळाला आहे. मात्र, विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याने आता या घटनेला राजकीय रंग लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला. घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला. त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना ६ व्या मजल्यावर दिसला. या फोटोवर २ वाजून ३३ मिनिटांची वेळ दिसत आहे. सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता

पोलिस सूत्रांच्या माहिती प्रमाणे, ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात.

आरोपी प्रभादेवी परिसरात लपला. पोलिसांना लोकेशन सापडलं. पोलीस तपास घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!