कोंकण
कोकण रेल्वे मार्गावर सुरत ते मडगाव ही विशेष गाडी १५ फेब्रुवारीला धावणार
मुंबई- कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आता आणखी एक विशेष गाडी धावणार आहे. सुरत ते मडगाव ही विशेष गाडी १५ फेब्रुवारीला कोकण रेल्वे मार्गावर सुरू होणार आहे.
गाडी क्रमांक ०९१९३ सुरत मडगाव स्पेशल ही गाडी सुरत येथून १५ फेब्रुवारीला सायंकाळी ७.५० वाजता सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचणार आहे.
परतीसाठी गाडी ०९१९४ मडगाव ते सुरत ही गाडी मडगाव येथून १६ फेब्रुवारीला दुपारी १.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सुरतला सकाळी ८.३५ वाजता पोचणार आहे.
या गाडीला वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.