पंतप्रधान परत चुकले,म्हणाले…बेटी पढाओ,बेटी पटाओ?? :IAS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत साधला पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली:- काही दिवसांपूर्वी अचानक टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलता-बोलता भाषणादरम्यान थांबले होते. यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. सोशल मीडियावर या संदर्भातले मिम्सही व्हायरल होत होते. अशात आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका चुकीच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
बेटी पटाओ??
आज फिर टेलीप्रांपटर ने धोखा दे दिया क्या? pic.twitter.com/TewCQNMzu2
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) January 20, 2022
‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानाची माहिती देत असताना आणि उपस्थित शालेय मुलींना मार्गदर्शन करत असताना अनावधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून ‘बेटी बचाव,बेटी पटाओ’ हे वाक्य गेले. यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता पंतप्रधानांवर सर्वच स्तरावरून टीका होताना दिसत आहे.
अशात माजी IAS अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा मोदींचा व्हिडिओ ट्विट करत ‘पुन्हा एकदा टेलिप्रॉम्टरने विश्वास घात केला की काय?’ असं खोचक कॅपशन दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोदींवर मिम्सचा पाऊस पडतोय.