भाजपला धक्का! माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये जाणार
अमरावती: भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. ‘माझी मूळ विचारधारा ही काँग्रेसची आहे. मी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं अशी सर्वांचीच इच्छा होती. मलाही तसं वाटत होतं. त्यास पक्षश्रेष्ठींनी होकार दिल्यामुळं मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्य मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री असलेल्या देशमुख यांनी २०१४ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. ‘राजकारण समजू लागल्यापासून ते २००९ पर्यंत मी काँग्रेससोबत होतो. माझी मूळ विचारधारा ही काँग्रेसची राहिली आहे.
मध्यंतरीच्या काळात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली. त्यावेळी काँग्रेस पक्षानं माझी हकालपट्टी केली होती. पक्षानं मला पुन्हा प्रवेश द्यावा यासाठी प्रयत्न करत होतो. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर देखील २०१४ पर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, २०१४ मध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण मूळचा काँग्रेसी असल्यानं माझ्या मित्राचा, सहकाऱ्यांचा ‘ असं ते म्हणाले.