महाराष्ट्रकोंकण

समुद्रात गायब झालेली ‘पाकिस्तानी’ बोट; 52 अधिकारी, 600 पोलिसांचा हेलिकॉप्टरसह संपूर्ण रायगडात शोध सुरू

रायगड : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील समुद्रकिनान्यावर संशयास्पद प्रकार समोर आला होता येथे रात्रीच्या अंधारात संशयास्पद बोट आढळली (बोटीचा काही भाग) आणि ती पुन्हा गायब झाली आहे. दरम्यान, आता याच बोटीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या अलिबाग रेवदंडाजवळ असलेल्या कोर्लई किल्ला येथे रडारवर नौदलाला एक बोट (बोटीचा काही भाग) दिसली रायगडच्या समुद्रकिनान्यावर अचानक अनोळखी जहाज असल्याचे समजले होते. ही माहिती रात्रीपासून कोस्टगार्डलाही मिळाली होती. मात्र ही बोट (7 जुलै) सकाळपासून शोधण्यात येत आहे. पण ती आता रडारवर दिसत नाहीये. हा प्रकार समोर आल्यानंतर रायगड पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यांनाही संबंधित संशयित बोट दिसलेली नाही. बोट खोल समुद्रात असल्याची माहिती मिळाली होती. आज सकाळी पासून पुन्हा या बोटीला शोधण्याचं काम सुरू होत. हेलिकॉप्टरच्या मदतीने देखील या बोटीचा शोध घेण्यात आला.

आता तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नौदलाच्या रडारवर दिसलेली ती बोट पाकिस्तानमधील होती. मुकद्दर बोया 99 असे या मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिस्तानी बोटीचे नाव आहे. ही बोट वादळामुळे पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्याहून भारतीय हद्दीत आली होती, असा नौदलाला संशय आहे. संशयित बोट आढळताच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे.

होटल, लॉज, रिसॉर्ट आणि इतर ठिकाणीही यंत्रणांनी झाडाझडती घेतली आहे. तर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचा बोया आणि त्याच्यासोबत ट्रांसपोटर्स वान्यामुळे वाहून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही बोट भारतीय हद्दीत दिसताच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. 52 अधिकारी आणि 600 पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.

या तपासानंतर रायगडच्या पोलिसांनीही मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. रेवदंडा समुद्रकिनान्यात जे आढळलं होत तो बोटीचा केवळ एक छोटा भाग होता. सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे. खबरदारी म्हणून पोलिसानी रायगड जिल्हा पिंजून काढला मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही. रायगडच्या पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!