कोंकण

रत्नागिरीत नगर वाचनालयाला रवींद्र चव्हाण, उदय सामंत यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला सदिच्छा भेट दिली. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी वाचनालयातर्फे त्या दोघांचे स्वागत केले आणि शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

वाचनालयाने १९६ वर्षे पूर्ण केली असून वाचनालयाची द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. या वाचनालयाची सध्याची इमारत वापरण्यायोग्य नाही, असा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आहे. त्यामुळे वाचनालयाच्या इमारतीचे मजबुतीकरण, नूतनीकरण अत्यावश्यक झाले असल्याने हे काम लवकरच सुरू करणार आहोत, असे वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.

रवींद्र चव्हाण यांनी वाचनालयाबाबतच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की वाचनालये ही शहराची सांस्कृतिक केंद्रे आहेत. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे काम अतिउत्कृष्ट व लोकाभिमुख आहे. रत्नागिरीमध्ये उत्तम वाचकवर्ग घडवण्यात वाचनालयाचा मोलाचा वाटा आहे. वाचनालयाच्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभा आहे.

उदय सामंत यांनी सांगितले की, वाचनालयाला नगरपालिकेकडून जागा मिळवून देण्यासाठी शासकीय पातळीवर मी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन वाचनालयाला ३० वर्षांसाठी ही जागा लीजवर मिळाली. वाचनालयाचे कार्य खूपच छान आहे. या वाचनालयाला माझे सर्वतोपरी सहकार्य सदैव राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!