मुंबईकोंकण

आंबोली पर्यटन सफरीसाठी दोन प्रवासी व्हॅन प्रदान

महेश पावसकर (सावंतवाडी) : कोकणातील पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या आंबोलीत अलीकडेच पर्यटकांसाठी दोन विशेष प्रवासी व्हॅन वनविभागाला देण्यात आल्या. या वाहनांचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हाधिकारी किशोर ताबडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, जिल्हा उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्री, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, शिदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण उफ बबन राणे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर,महिला शहर प्रमुख भारती मोरे आदी उपस्थित होते. सावंतवाडी वनक्षेत्रासाठी या दोन प्रवासी व्हॅन सिंधू रत्न योजनेतून देण्यात आल्या.

 

प्रवासी व्हॅनचे उद्घाटन करताना मंत्री दीपक केसरकर. सोबत जिल्हाधिकारी किशोर तावंडे, उपवनसंक्षक एस. नवकिशोर रेही, वनक्षेत्रपाल विद्या घोंडके, मदन क्षीरसागर आदी. 

या दोन व्हॅनद्वारे आंबोलीतील पर्यटनस्थळे जसे की नांगरतास धबधबा, कावळेसाद पॉईट, महादेव गड, हिरण्यकेशी उगम, आंबोली वनउद्यान या स्पॉटला पर्यटकांना नेले जाईल. यासाठी स्वतंत्र सफरीचे पॅकेज तयार करण्यात आले आहे.

आंबोली वन तपासणी नाका येथून दररोज सकाळी ९ वा. पर्यटकांना सफरीसाठी घेऊन या व्हॅन निघणार आहेत सकाळी ९ ते दुपारी १वाः आणि दु. २ ते सायंकाळी५ वा. अश्या दोन वेळा या फेऱ्यांसाठी असणार आहत. या सफारीसाठी किमान पाच व्यक्तींची नोंदणी आवश्यक आहे.

दुपारच्या सफारीसाठी ३ वा. पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अमृता पाटील यांच्याशी संपर्क करणे आवश्यक आहे. या सफरीमध्ये पर्यटकांना दुर्मिळ सरीसृप व उभयचर प्रजातींचा निसर्गानुभव घेता येणार आहे. 3 या आयुवदिक या सफरीमध्ये सायंकाळी ६ ते ९वा.या वेळेत निसर्ग भ्रमंती करताना सोबत गाईड असणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान आणि मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सफारीसाठी आंबोली येथील वनरक्षक गोरक्ष भिंगारदिवे तसेच अमृता पाटील यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!