केंद्र सरकारने दिले अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश!

दापोली:- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. दापोली समुद्रकिनार्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट आणि सी क्रोच रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनाधिकृत असून त्याविरोधात कारवाई करावी,अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती.
याच मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले आहेत. पर्यावरण कायद्याचा भंग करून अनिल परब यांनी गैरकायदेशीर रित्या फसवणूक करून हा रिसॉर्ट बांधला असून यामध्ये पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पर्यावरण कायद्याच्या कलम १५ व १९ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.
यावर,माझ्या मागणीला यश आल्यामुळे मी समाधानी आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लवकरच ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे अशीच कारस्थान उघडी करणार असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद आता राज्याला पाहायला मिळणार आहे.