मुंबई

‘सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण !

नोव्हेंबरमधे आमचं सरकार येणार, रस्ते घोटाळ्यातील भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागणार

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां. आमदार आदित्यजी ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेतून रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरून इशारा दिला आहे . यावेळी बोलताना खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे . चाकरमानी कोकणात आता गणपती ला जातील . गडकरी यांना आवाहन आहे, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं . मग कळेल किती काम झालय . कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल सरकारवर केला .

यावेळी आदित्य ठाकरे यांनी १५ मे २०२३ रोजी मुंबईतील मेगा रस्ते घोटाळा सर्वांसमोर आणला होता . त्याविषयी बोलताना ‘आता जुलै २०२४ आहे, अजूनही काम झालेलं नाही . यात दक्षिण मुंबईतील कंत्राटदार याने काम केलं नाही म्हणून त्याला काढलं की ब्लॅक लिस्ट केलं ? दंड लावला तो वसुल केला का ? हा प्रश्न समोर येतोय . पण नोव्हेंबर मध्ये आमचा सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरच स्टॉप पेमेंट करणार आहोत,  हे काम थांबवणार आहोत . ह्यावर्षी पुन्हा मिंधे-भाजप सरकारने ६००० कोटींच्या वेगळ्या निविदा काढल्या आहेत . ह्यावेळीसुद्धा आवडत्या पाच कॉन्ट्रॅक्टर मित्रांची निवड केली आहे. रस्त्याचं काम होवो अगर न होवो, निधीत वाढ नक्की होतेय आणि काम मिंधे-भाजप सरकारच्या आवडत्या मित्रांनाच मिळतंय’ . अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली ..

‘सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण !

 सरकारवर टीका करताना ‘बांद्रा वर्सोवा सी लिंकचे काम अजूनही सुरु झालेल नाही . लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम राज्यात सुरु आहे . काम होवो न होवो कॉन्ट्रॅक्टमध्ये कलेशन झालय . सरकारचे खोके, जनतेला धोके हे सध्यातरी धोरण सद्या सुरु आहे . पण दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याच काय झालं ? मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकर्णाच काम किती झालं ? हे आम्हाला महापलिकेने सांगाव . घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मित्राला कंत्राट द्यायचा म्हणून आपण हे सोसायच का ? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!