आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी दर्शवला विरोध,राज्य सरकारसमोर नवा पेच

मुंबई- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता.परंतु,आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.
राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे. काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.
आता महाविकास आघाडी समोरील अडचणी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.यावर आघाडी काय निर्णय घेणार आणि कश्या निवडणूका पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.