फॅन्सच्या विचित्र मागण्यांमुळे द ग्रेट खलीनं उचचलं हे पाऊल

भारतीय रेसलर द ग्रेट खली संध्या भलताच वैतागला आहे. त्याच्या वैतागण्या मागचं कारण दुसरं तिसरं कुणी नसून त्याचेच फॅन्स आहेत. ‘द अंडरटेकर’, केन, बिग शॉ, जॉन सीना आणि शॉन माइकल्स सारख्या आणखी अंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध रेसलर्सना धोबी पछाड करणारा द ग्रेट खली त्याच्या फॅन्सकडून येत असलेल्या विचित्र मागण्यांमुळे वैतागलाय. सोशल मीडियावर सध्या त्याचे वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होताना दिसून येत आहेत. या सगळ्या कारणांना वैतागून द ग्रेट खलीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय.
खलीचे खरे नाव दलीप सिंग राणा असून तो मुळचा हिमाचल प्रदेशचा राहणारा आहे. ‘द ग्रेट खली’च्या नावाने प्रसिद्ध असलेला वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चॅम्पियन दलीप सिंह राणाचे भारतात मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा बराच सक्रिय असतो.
नेहमीच फोटोज आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून तो पंजाबी गाण्यांवर रील्स देखील बनवताना दिसून येत होता. पण द ग्रेट खलीच्या काही फॅन्सनी सोशल मीडियावर खोडसाळपणा सुरू केलाय. द ग्रेट खलीवर वेगवेगळ्या खिल्ली उडवणाऱ्या मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. यात त्याचे फॅन्स त्याच्याकडे “सर… सर…” बोलून लागोपाठ विचित्र मागण्या करताना दिसून येत आहेत. हे मीम्स इतके व्हायरल होऊ लागले आहेत की सध्या खली हा मीम्सचा नवा ट्रेंड बनलाय.
काही मीम्स
फॅन्सच्या विचित्र मागण्यांमुळे वैतागून द ग्रेट खलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सची सेंटिगच बदलनू टाकली आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टना असणारे कमेंट सेक्शनच बंद करुन टाकले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या मीम्सना वैगातून त्यानं हे पाऊल उचललंय.