देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्व्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रल्नागिरी – ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात, जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्ग, मुख्याधिकारी तुषार बाबर, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करुन रत्नदुर्ग शिवसृध्टीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टचूगॅलरीची पाहणी केली. तेथून कळ दाबून पालकमंत्री सामंत यांनी समोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे लोकार्पण केले आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी डोळयाचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालकमंत्री सामंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, कोकणातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या शिवसष्टीचे आज लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पहायला मिळेल. अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उभा पुतळा आहे. जे जे स्कूल ऑफ ऑर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.