कोंकण
निर्बंध उठवले असले तरीही कोरोना चे नियम पाळा:पालकमंत्री उदय सामंत
धमकीचा नव्हे,तर व्यापाऱ्यांच्या भावनेचा आदर..
कुडाळ:सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. त्यामुळे अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात आपण आलो आहोत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमकी चा नव्हे तर भावनेचा आदर करून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र सकाळी सात ते चार वाजेपर्यंत त्याचे बंधन असणार आहे,अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी काल घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान निर्बंध उठवले असले तरीही कोरोना चे शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे