मंत्रालयनवी दिल्लीब्रेकिंगमहाराष्ट्र
एटीएम कार्ड विना पैसे काढणे झालं शक्य !
केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई : तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तरीसुध्दा तुम्हाला पैसे काढता येणार आहे. केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी UPI ऍप्लिकेशनसह सक्षम केलेल्या एटीएमचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवर म्हणटले आहे की, फिनटेकचे भविष्य आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस UPI एटीएममधून पैसे काढताना दिसत आहे. तो प्रथम एटीएम स्क्रीनवर प्रकर्शित यूपीआय कार्डलेस कॅश पर्यायावर क्लिक करतो आणि पैसे काढण्याची रक्कम विचारली जाते. रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रिनवर एक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तो UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करतो आणि त्याचा पिन टाकतो. काही वेळानंतर रोख रक्कम वितरीत करते. त्यामुळे आता एटीएम कार्ड विना पैसे काढणे सोपं झालं आहे.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1699652077679767851?s=20