…तर मी गुवाहाटीत असतो…मंत्री उदय सामंत

रत्नागिरी:मी जोडणारा कार्यकर्ता आहे. तोडणारा नाही. त्यामुळे हे सर्व मला जोडावेसे वाटते. मी ठाकरेंना सोडून गेलो नाही, ना कधी जाईन…गेल्या दोन दिवसांपासून मी गुवाहाटीला आहे, अशा चर्चा सुरू होत्या. जर मी एकनाथ शिंदें बरोबर असतो, … तर मी गुवाहाटी ला असतो..असा टोला त्यांनी लगावला. मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पाली येथील निवासस्थानी उदय सामंत यांनी काल पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती मी पार पाडणार आहे. ते म्हणाले की, पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचे आहे. या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेना पक्ष डॅमेज होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात पक्षपात केल्याचे आमदारांनी म्हटले आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा महाविकास आघाडीतील नेते काय बोलत आहेत, यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही सगळे एकसंघपणे राहणे ही आमच्या दृष्टीने आमच्या घडीची सर्वात आवश्यक गोष्ट आहे.





