मनोरंजन

हॉलीवुडपट स्पायडरमॅनची बॉक्स ऑफिसवर चांदी, अवघ्या दोन दिवसात कमावले तब्बल इतके कोटी रुपये

मुंबई:- युवा पिढीमध्ये सध्या स्पायडरमॅन या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशातच जगभर प्रदर्शित झालेला स्पायडरमॅन बॉक्स ऑफिसवर कल्ला करत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर भारतातील बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला हॉलीवूडचा पहिलावहिला चित्रपट असल्याने स्पायडरमॅन युवकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

स्पायडरमॅनने बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसात अब्जावधी डॉलर्सचा गल्ला जमवला आहे. माध्यमांमधील रिपोर्टनुसार, स्पायडरमॅन सिनेमानं ३०२.९ दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. उद्या म्हणजेच रविवार नंतर हा आकडा अर्धा अब्ज डॉलर चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

मार्बलचा नवा सुपरहिरो सिरीजमधील सिनेमा ‘स्पायडरमॅन: नो वे होम’ हा जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसवर गल्ला करण्याचा नवीन रेकॉर्ड तयार करणारा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये तयार करण्यात आलेले ॲनिमेशन प्रेक्षकांना सिनेमागृहात खेळवून ठेवतायेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!