राष्ट्रीयकोंकणमहाराष्ट्रमुंबई
हेटकरी दिवाळी विशेषांकाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई – भंडारी समाजाचे गेली ८५ वर्षे मुखपत्र असलेल्या हेटकरी मासिकाच्या दिवाळी विशेषांक – २०२४ चे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे ,आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी शंकर उर्फ नाना हळदणकर, विश्वस्त भंडारी मंडळ दादर, विश्वस्त आशिष पेडणेकर, कायदे विषयक प्रमुख सल्लागार ॲड. डॉ नीलेश पावसकर, सुर्यकांत बिर्जे, उपाध्यक्ष कित्ते भंडारी ऐक्य वर्धक मंडळ, डॉ संजय लाखे पाटील, संदेश मयेकर, अनंत सुर्वे.सह सेक्रेटरी सागर रेडकर, गंगाराम पेडणेकर, उद्योजक प्रकाश महादेव तांबोस्कर आदी मान्यवर उपस्थितीत होते.