काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाइन पितात – अजित पवार

मुंबई:- द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी यासाठी राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशात पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही देशांमध्ये वाईन पाण्याप्रमाणे पिली जाते असं वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अजित पवार यांच्या विषयी पुढे बोलताना म्हणाले,’ वाईन आणि दारू यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. असे अनेक फळं आपल्याकडे आहेत.
आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाणही अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यात आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात. हे आपल्याला माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्व दिलं आहे’.