कोंकणक्रीडा

नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत लांजाचा सुपुत्र ठरला राष्ट्रीय पातळीवर स्ट्रॉंग मॅन

लांजा : तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र सुशांत सोनू आगरे याने छत्तीसगड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत ६७.५ किलोग्रॅम वजनी गटात २२५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तसेच स्ट्रॉंग मॅन म्हणून देखील त्याने कित मिळविला आहे.

३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान छत्तीसगड, विलासपूर येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील नामांकित खेळाडूंमध्ये सुशांतने आपली छाप पाडली. येत्या २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुशांत आगरे याची भारतीय संघात निवड झाली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!