न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पी उत्तर पूर्व भाग गणपती विसर्जासाठी सज्ज! आमदार सुनिल प्रभूंनी घेतला गणपती विसर्जन व्यवस्थेचा आढावा

मुंबई : न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फूटांच्या आतील सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे यंदा जवळपास सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच होणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मालाड पूर्व भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील १ नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळा सहा ६ कृत्रिम तलाव आणि ३ फिरते विसर्जन तलाव होते. यंदा डॉ. बाबासाहेब उद्यानातील १ नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळावर देखील ठिकाणी एक कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात आला आहे. यामुळे यंदा पी उत्तर पूर्व भागा करिता कृत्रिम तलावांची संख्या ७ असेल. दरवर्षी पाच फूट खोल कृत्रिम तलाव तयार केले जातात. यंदा काही तलावांची खोली सहा फूटांपर्यंत असेल.
एकंदरीत गणेशोत्सव आणि विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी आमदार सुनिल प्रभु महापालिका नोडल एजन्सी, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस विभाग, अग्निशमन विभाग, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत सतत पाठपुरावा करत आहेत.
Box
* डॉ. बाबासाहेब उद्यानातील नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळावर ६ फुटावरील मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
* डॉ. बाबासाहेब उद्यान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* सन्मित्र मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* टोपीवाला मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* रामलीला गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* कबड्डी महर्षी बुवा साळवी मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* माँ साहेब मीनाताई ठाकरे मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ६ फूट
* संकल्प सोसायटी गणपती विसर्जन कृत्रिम तलाव – खोली ५ फूट
तसेच यंदा जास्त मूर्ती असतील. त्यामुळे सतत तलावातील मूर्ती काढून ठेवण्याची व पाणी बदलण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती आमदार सुनिल प्रभु यांनी दिली असून तुमच्या परिसरातील कृत्रिम तलावांची माहिती मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (MyBMC) भेट देऊ शकता अशी माहिती देखिल दिली. यानुसार आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाचे पालन करावे असे आवाहन करत गौरी गणपती उत्सवासाठी सर्व गणेश भक्तांना आमदार सुनिल प्रभु यांनी शुभेच्छा दिल्या!