पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील रवींद्र सामंत यांना ‘जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा ‘रत्नागिरी जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावचे मुळ रहिवासी असलेले रवींद्र सामंत व्यवसायानिमित्त रत्नागिरीतील पाली या गावात स्थायिक होऊन विविध व्यवसायात त्यांनी चांगला जम बसवला. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक गरजवंतांना सढळहस्ते मदत करणे, व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाच्या माध्यमातून ज्ञातीच्या सर्वांगिण आपल्या प्रगतीसाठी सदैव अग्रेसर रहाणे या सर्व बाबींची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. लवकरच हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचे ब्राह्मण युवक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी सांगितले.