प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, मराठी सिने सृष्टी वर शोककळा !

मुंबई: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्ष तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या एग्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया मराठे हिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिचं निधन झाल्याची माहिती आहे. सकाळी चार वाजता मीरा रोड येथे कर्करोगाने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे वय 38 वर्ष होते. संध्याकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. मीरारोडमध्ये राहत्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला.
चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या, या मालिकांमध्ये प्रिया मराठेने भूमिका साकारली होती. मालिका क्षेत्रातून प्रियाने मोठं नाव कमावलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे ही कर्करोगाशी झुंज देत असल्याची माहिती अभिनय क्षेत्रातील फारशा कुणाला माहीत नव्हतं, असं समोर आलं आहे. मात्र बऱ्याच महिन्यांपासून ती कर्करोगावर उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे.