शिवसेनेच्या मागणीनुसार मालाड रेल्वे स्थानक पूर्व येथे दुचाकी वाहनतळ सुरू! शिवसेनेच्या मागणीला यश

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- मालाड पूर्व परिसरातील कुरारगांव परिसरामध्ये सुमारे अडीच ते तीन लाख लोकवस्ती असून येथील नागरिकांना नोकरी – व्यवसायाचे निमित्त मालाड रेल्वे स्थानकावर येतात. परंतु मालाड पूर्व परिसरात रेल्वे प्रशासनाची वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याचे बाजूला कुठेही पार्किंग करण्यात येत होती व अवैधरित्या पार्किंग कैलेली वाहने टोईंग करून नेल्यामुळे नागरिकांना आर्थिक दंड सहन करावा लागत होता.
यामुळे परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. अनेकदा दुचाकी चालक रस्त्यावरच गाडी लावून दुकानात साहित्य घेण्यासाठी जातात. यावेळी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने याचा त्रास नागरिकांनाच सहन करावा लागत असे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती येथील रहिवाश्यांना शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर व मुख्य प्रतोद, आमदार, विभाग प्रमुख सुनिल प्रभु यांचेकडे केली.

यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मालाड रेल्वेस्थानक विस्तारात दुचाकी वाहन तळाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी २०१७ साली शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर व मुख्य प्रतोद, आमदार, विभाग प्रमुख सुनिल प्रभु यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपरोक्त ठिकाणी तातडीने वाहनतळ सुरु करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच मालाड स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्या वेळी या वाहनतळाचेही सुसज्जीकरण करण्यात येईल असा प्रस्ताव विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे पाठविण्यात येऊन त्यास मंजूरी घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
याप्रसंगी खा.गजानन कीर्तिकर यांचेसह आमदार सुनिल प्रभु , नगरसेविका विनया सावंत उप विभागप्रमुख विष्णू सावंत , संतोष धनावडे , नगरसेवक आत्माराम चाचे . पश्चिम रेल्वेचे अधिकारी अभय साने , श्री. आर. के. शर्मा , वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . कटकपॉड , सहा , मनपा अभियंता अमित जाधव तसेच माजी नगरसेवक प्रशांत कदम , गणपत वारीसे , रिना सुर्वे , सुनिल गुजर , शिवसेना शाखाप्रमुख व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.शिवसेनेने केलेल्या मागणी नुसार मालाड स्थानक पूर्व येथे वाहनतळ सुरू झाले असून यामुळे नागरिक शिवसेनेचे आभार व्यक्त करत आहेत.





