महाराष्ट्रकोंकण
चाकरमानी नको, आता ‘कोकणकर’ म्हणा – अशोक वालम

कोकण : सत्तर-ऐंशीच्या दशकात कोकणवासीय कामधंद्यानिमित्त मुंबई, पुणेसारख्या मेट्रो शहरात उपजीविकेसाठी नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत; मात्र त्यांची नाळही कोकणाशी कायम जोडलेली आहे. चाकरमानी म्हणजे स्वातंत्र्य गमावलेले, गावं सोडून न परतलेले, परावलंबी झालेले असा अर्थ असून अपमानित इतिहास आहे. त्यामुळे यापुढे स्वावलंबी उपजीविका, गावाशी नाळ जोडलेले, संस्कृतीचा रक्षणदार आणि अभिमानाची ओळख म्हणून यापुढे ‘कोकणकर’ असाच उल्लेख करावा असा आग्रह आहे, असे प्रतिपादन बळीराज सेना अध्यक्ष अशोक वालम यांनी केले आहे.
बळीराज सेनेच्या माध्यमातून चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणावे, अशी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजकल्याण विभागाला या संदर्भात दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा याविषयी चर्चेला उधाण आले.