केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 लाख रुपये!

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मात्र,दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबत नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंटने याबाबत सरकारकडे मागणी केली आहे की, महागाई भत्ता देताना 18 महिन्याच्या प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता थकबाकीचाही एकाचवेळ निपटारा करण्यात यावा. मात्र,सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. कर्मचारी अजूनही मागणीवर ठाम असून सरकारशी चर्चा सुरू करत आहेत. मात्र, लवकरच याबाबत मंत्रिमंडळ सचिवांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, देशात एकूण ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे ६० लाख निवृत्ती वेतनधारक आहेत.
नॅशनल काऊन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, श्रेणी-1 कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी ११८८० रुपये ते ३७५५४ रुपये आहे. तर, श्रेणी-१३ किंवा श्रेणी-१४ साठी गणना केली गेली तर कर्मचार्याच्या हातात महागाई भत्ता थकबाकीचे १,४४,२०० रुपये ते २,१८,२०० रुपये दिले जातील.
१८ महिन्यांच्या थकबाकीचा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला आहे. जर पंतप्रधान मोदींनी १८ महिन्यांच्या थकबाकीला हिरवा झेंडा दाखवला, तर सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतन धारकांना त्याचा लाभ मिळत आहे.मात्र,दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.





