महाराष्ट्र

आता ‘या’ व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहता येणार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

महाराष्ट्र: ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर निवडणूक लढवायची असेल तर सरकारनं लागू केलेली नवी पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण आता पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे.

ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरतेय. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे.
तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!