राष्ट्रीय

मोदींजी मौन सोडा आणि उत्तर द्या,गलवान खोऱ्यात चीननं ध्वज फडकवल्यानंतर राहुल गांधींचं मोदींना आवाहन

गलवान:- आंतरराष्ट्रीय नियंत्रण सीमा रेषेवर चीनच्या हरकती काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. चीनने २०२२ च्या पहिल्याच दिवशी गलवान खोऱ्यात चिनी ध्वज फडकवत कहर केलाय. याच ध्वज फडकवण्याचा व्हिडिओ देखील चीननं सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या आधी गलवान खोऱ्यात २०२० मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता.यानंतर बऱ्याचदा चीनने नियंत्रण रेषेजवळ खुरपती केल्या होत्या.

अश्यात आता पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात चिनी ध्वज फडकवून चीनने आपली मर्यादा ओलांडली आहे.या घटनेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधत टिकास्त्र डागलं आहे.मौन सोडून आता काहीतरी अकॅशन घ्या असं आवाहन राहुल गांधी यांनी मोदींना केलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी:-
गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच चांगला दिसतो.त्यामुळे आता मौन सोडा आणि चीनला उत्तर देण्यासाठी तयार व्हा! असं आवाहन राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आहे.राहुल गांधींनी या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टिकास्त्र देखील डागल्याचं पाहायला मिळालं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!