महाराष्ट्र

रत्नागिरी, सिंधुदुर्गात एकही पर्ससीन परवाना नाही, बेकायदेशीर मच्छिमारी केल्यास कारवाईची शक्यता….

मुंबई:महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात निश्चित केलेल्या हद्दीत अधिकृत परवानाधारक पर्ससीन नौकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मासेमारी करता येते. परंतु, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने पर्ससीन मासेमारीसाठी कोणतेही परवाने जारी केलेले नाहीत. त्यामुळे १२ सागरी मैलाच्या आत पर्ससीन मासेमारी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवैध पर्ससीनधारकांचे धाबे दणाणले आहेत. कुवेसकर म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पर्ससीन मच्छीमारी कवळ १२ सागरी मैलांपलिकडे राष्ट्रीय हद्दीत करता येईल.

परंतु राज्याच्या १२ सागरी मैल हद्दीच्या आतमध्ये पर्ससीन मासेमारी करता येणार नाही कारण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्या कुणालाही तसे परवाने देण्यात आलेले नाहीत. तरी पण कुणी नियमबाह्य पर्ससीन मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास गस्ती नौका आणि ड्रोनच्या सहाय्याने प्रभावीपणे कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!