क्राइममुंबई

आमदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे मृत इकिता लोट च्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून रुपये १० लाखांची मदत

आरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गमावला होता जीव..

मुंबई—:दिपावलीच्या पहिल्याच दिवशी आरेतील युनिट क्रमांक १५ येथे इकिता लोट हीच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीचा दुर्देही मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर आमदार रविंद्र वायकर यांनी तात्काळ घटनास्थळाची पहाणी करुन इकिताच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच आर्थिक मदतही केली होती. तसेच इकिताच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार मदत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

राज्य शासनाच्या नियमानुसार इकिताच्या कुटुंबियांना एकुण २० लाख रूपयांची मदत देण्यात  येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून इकिताच्या वारसांना पहिल्या टप्प्यात रुपये १० लाखांचा चेक आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आला. तसेच उर्वरीत १० लाख रूपये फिक्स डिपॉझिट्स रूपात वडीलांच्या नावे येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे.

यावेळी वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी राकेश भोईर, वनपाल अधिकारी नारायण माने, रामा भांगरे, धुरी, वनरक्षक सुरेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, मयुरी रेवाळे, हर्षदा गावडे, राहुल देशपांडे, पुजा शिंदे, अजय प्रधान, वैभव कांबळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!