सत्तास्थान बळकटीसाठी शिवसेनेशी युती, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर

मुंबई: कार्यकर्ता सक्षम झाला तरच समाज त्याच्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचेल. त्यालाही समाजाचे प्रश्न सोडविता येतील. यातून आंबेडकरी राजकीय चळवळ गतिमान होण्याबरोबरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रिपब्लिकन पक्ष संघटना बळकटीचे स्वप्न साकार होईल. कार्यकर्त्याला उभे करण्याची ताकद सत्तेमध्ये आहे. कार्यकर्त्याला सत्तेची चव चाखता यावी, यासाठी आपण शिवसेनेशी युती केली, असे स्पष्ट करतानाच आगामी निवडणुकीत माझा कार्यकर्ताही सत्तेत येईल, असा ठाम विश्वास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी चिपळुणात व्यक्त केला.
आपल्याला यश मिळवायचे असेल तर एकजूट राखायला हवी. मतभेद बाजूला सारले पाहिजेत गटबाजी न करता प्रत्येक जण आपल्या विचारांचा आहे, असे समजून कामाला लागा. तसेच निवडणुकीत वरिष्ठ पातळीबडू आपली ज्यांच्या सोबत युती आहे, त्याच्यासोबतच काम करा, असे आवाहन आंबेडकर यांनी या वेळी केले.
वंचितचे माजी पदाधिकारी महेश सकपाळ, बुध्दघोष गमरे, विलास मोहिते, विलास जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी यावेळी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत करीत सहकार्याची ग्वाही दिली. रविवारी (दि. ३१) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे,
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात तो बोलत होते. या वेळी त्यांनी पक्ष स्थानिक निवडणुकीच्या
सिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. तसेच १४ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांची यादी आपल्याकडे पाठविण्याबरोबरच कार्यकत्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. संदेश मोहिते व सहकाऱ्यांनी मेळावा यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.