महाराष्ट्रवाहतूक

कर्नाटक मार्गावरील वाहतूक ठप्प! सलग तिसऱ्या दिवशी 600 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सलग तिसऱ्या दिवशी कर्नाटक मार्गावरील सुमारे सहाशेहून अधिक फेऱ्या रद्द केल्या. बेळगावसह कर्नाटकच्या विविध भागांत सुमारे वीस हजारांहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. चित्रदूर्ग येथे झालेल्या घटनेमुळे सोमवारी लांब पल्ल्यासह आंतरराज्य मार्गावरील बससेवा बंदच होती. आंतरराज्य बसच्या दोन्ही परिवहन महामंडळांच्या सुमारे बाराशे फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे बसस्थानकातील महाराष्ट्र फलाट मोकळेच पडले होते.

तर इतर फलाटांवरही प्रवासी, मजूर, विद्यार्थी व कामगारांची वर्दळ कमी दिसत होती. अनेकांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे या गाड्यांचे भाव वाढले होते. दोन्ही राज्यांतील बसेस आपापल्या हद्दीतून माघारी जात होत्या. सुरक्षितेसाठी कोगनोळी टोल नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. महाराष्ट्राच्या कर्नाटकातून विविध भागांत जाणाऱ्या दोन दिवसांत ६७२, तर कर्नाटकातून महाराष्ट्रात विविध भागांत जाणाऱ्या ५५० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांचे कोटीचे नुकसान झालेले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!