आगीत झोपड्या जळालेल्या आप्पा पाड्यातील क्षतीग्रस्त कुटुंबांना आमदार सुनिल प्रभू यांचा मदतीचा हात
एकटे पडू देणार नाही' आ.सुनिल प्रभूंची ग्वाही

मुंबई-बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी; आंबेडकर नगर, दत्त मंदिर रोड, हनुमान चाळ कमिटी, आप्पा पाडा, मालाड येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनी वरील सात झोपड्या आगीत जळून भस्मसात झाल्या. जीवित हानी नसली तरी वित्त हानी झाली होती.
अशा सात बाधित कुटुंबाचे संसार रस्त्यावर आल्यावर आमदार विभाग प्रमुख श्री. सुनिल प्रभू यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत केली. ‘यापुढे देखील त्यांना येणार्या कोणत्याही अडचणीत त्यांना एकटे पडू देणार नाही’ अशी ग्वाही आमदार श्री. सुनिल प्रभू यांनी दिली.
शिवसेना शाखा क्र. ४२ येथे झालेल्या या छोटेखानी सांत्वन कार्यक्रमात बाधीतांच्या डोळ्यातून प्रभू साहेबांप्रती कृतज्ञता अश्रु आले.
या वेळी विधानसभा संघटक श्री प्रशांत कदम, युवासेना सह सचिव श्री. समृध्द शिर्के, महिला उपविभाग संघटिका सौ सानिका शिरगावकर, शाखाप्रमुख श्री मोहन परब, महिला शाखा संघटिका श्रीमती संजीवनी रावराणे, शाखा समन्वयिका सौ योगेश दिवेकर, तसेच सर्व उपशाखाप्रमुख गटप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.