महाराष्ट्र
मुंबई- गोवा महामार्ग निकृष्ट कामामुळे बनतोय धोकादायक
मुंबई: गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना संगमेश्वरजवळ सोनगिरीजवळ टाकलेला भराव वाहून गेल्याने एका बाजूचा रस्ता खचला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर येथील रस्ता आणखी खचण्याची भिती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
मुबंई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात सोनगिरीजवळ अतिवृष्टीमुळे पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता एका बाजूने खचल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू असून रस्ता आणखी खचण्याची भिती व्यक्त होत आहे.






