भाजपचा ‘हा’ नेता एक नंबरचा दलाल, त्याची दलाली मी बुडविणार,विनायक राऊत यांनी कोकणातल्या नेत्यावर साधला निशाणा..

रत्नागिरी – नाणारचा प्रकल्प सुरू होणार की नाही यावरून कोकणात वाद सुरू असतानाच आता जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी वाढल्या आहेत. सध्या सिंधुदुर्गात जिल्हा बॅंक आणि इतर तीन नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. यानिमित्ताने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला. देवगड येथील मेळाव्यात ते बोलत होते.
नाणार प्रकल्प येणार म्हणून भाजपच्या प्रमोद जठार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेतल्या होत्या. मात्र, हा प्रकल्प रखडल्याने त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. यावरून राऊत यांनी जठार यांच्यावर हल्लाबोल केला. प्रमोद जठार एक नंबरचे दलाला आहेत. त्यांच्या १० पिढ्या गेल्या तरी शिवसेना कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. तुमची दलाली बुडाल्याचं मला दु:ख वाटत नाही, असे राऊत म्हणाले.
पुढे राणे परिवारावर टीका करताना राऊत म्हणाले की, भाजपमध्ये गेल्यावर राणे कुटुंबीयांनी त्यांचे रंग बदलले. विरोधी पक्षात असताना नारायण राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत होते. मात्र, आता भाजपमध्ये गेल्यापासून त्यांनी चुप्पी साधली आहे. राणे कुटुंबीयांनी दुटप्पी भूमिका सोडावी. राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा आंदण म्हणून दिलेला नाही, असाही इशारा राऊत यांनी दिला.