देशविदेश

उत्तराखंडमध्ये जीवघेणा अपघात – प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळली

उत्तराखंड : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो ट्रॅव्हलर असण्याची शक्यता आहे. ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. तसेच या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, आथापर्यंत पाच ते सात प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असून, अपघातग्रस्त वाहनामधील १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!