आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई:- शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याच मुद्दयावरून विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी दाभोलकर, पानसरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कर्नाटकातील आरोपी होते, असे म्हटले. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या मागण्या केल्या.
यावर फडणवीस म्हणाले की, हत्यांचे प्रकरण महाराष्ट्रातील असो किंवा कर्नाटकातील असो, जे गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. ठाकरे यांच्या धमकीबाबत आणि सनातन संस्थेबाबत पुरावे असतील तर या प्रकरणाची राज्य सरकारने कसून चौकशी करावी. आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन येणे ही गंभीर गोष्ट आहे, या प्रकरणी पुरावे असतील तर केंद्राकडे द्यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
सनातन संस्था असल्याने त्याची या सरकारला अडचण वाटत आहे. दोन वर्षांपासून यांचेच सरकार आहे. मग इतकी दिवस का अशा संस्थांवर कारवाई केली नाही? पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हि घटना अत्यंत वाईट आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात २०१२ साली भुजबळांचे संकेत असताना प्रस्थाव आला. मात्र, तो केंद्राकडे पाठविण्यात आला नाही. आम्ही पाच वर्षे होतो. आम्ही पाठवू शकलो नाही. तुमचे आता दोन वर्षे झाले सरकार आहे तुमच्याकडे पुरावे असतील तर या संदर्भात तक्रार दाखल करावी, असे सुद्धा फडणवीसांनी बोलून दाखविले होते.