महाराष्ट्र
ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत.त्यांच्या सोबत संजय राऊत अनिल परब हेही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्वादरम्यान ठाकरे बंधूंची भेट झाली होती, त्यानंतर आज पुन्हा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज व उद्धव यांची भेट झाली.
ठाकरे बंधूंची ही भेट अचानक नसून पूर्व नियोजित बैठक होती. दोन दिवसांपूर्वीच आजची बैठक ठरली होती अशी माहिती सुत्रांकडून मिळाली .आगामी महापालिका निवडणूका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असून त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. असल्याचे समजते. राजकीयदृष्ट्या ही भेट महत्वाची मानली जात आहे.