जरांगेना भेटायला गेलेल्या खा.सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव: गाडीवर फेकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे याना भेटण्यास गेलेल्या खा. सुप्रिया सुळे याना मराठा आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले.
गणेशोत्सवाच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलकांसह मुंबईत धडकले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर यंत्रणेवर त्राण येत असल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या आंदोलना चा तिसरा दिवस आहे. आज सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र ही भेट झाल्यानंतर बाहेर निघताना सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. दरम्यान, यावेळी शरद पवारांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर सुप्रिया सुळेंना आपल्या कारपर्यंत पोहोचत असताना मराठा आंदोलकांनी घेरलं. आंदोलकांच्या मोठ्या गराड्यातून वाट काढताना सुप्रिया सुळेंची चांगलीच दमछाक झाली.