महाराष्ट्र
कोकणात नारळाचे दर वधारले, दरवाढीने बिघडविले स्वयंपाकाचे गणित

कोकण : गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण. या सणात मोदक आणि इतर नारळाचे पदार्थ घराघरात बनतात. पारंपारिक मोदकांसाठी नारळाच्या खोबऱ्याची गरज असते. परंतु यंदा नारळाचा भाव प्रतिनग ४० ते ४५ रुपयांच्यापुढे होता. काही ठिकाणी तर १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच गणेशोत्सव काळात नारळाचा काटकसरीने वापर करण्यात आला. गृहिणींना नारळाला पर्याय म्हणून शेंगदाण्याचा कूट, सुके खोबरे किंवा अगदी तयार खोबऱ्याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. गणेशोत्सव संपत आला तरीही म्हाळवस, नवरात्रौत्सव, दिवाळी या सणातही नारळाचे दर चढे राहणार आहेत. कोकणात मत्स्य खवय्ये मोठ्या प्रमाणात आहेत. माशांच्या कढीत नारळ वापरला जातो. त्यामुळे मागणी मोठी असते.