महाराष्ट्र

सरकारी नोकरदाराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार

मुंबई: राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सावाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे / कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक नाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे, या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल 5 दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळाती खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची आतुरता घरोघरी पाहायला मिळते, त्यासाठी मंडप सजावट ते गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अधिक खर्च करत भाविक सेलिब्रेशन करतात. त्यामुळेच सरकारने 5 दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!