खा. रविंद्र वायकरांनी पी. एम. सी बँक प्रकरणी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली
हक्काच्या पैश्यासाठी संघर्ष करणाऱ्या खातेदारांच्या संबंधी स्वत: वित्तमंत्र्यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले

नवी दिल्ली – मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी गुरुवार 1 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची लोकसभेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी खासदार वायकर यांनी सवीस्तर चर्चा केली. गेली 5 वर्ष स्वतःच्या हक्काच्या पैश्यासाठी झगडणाऱ्या पंजाब व महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील (पी. एम. सी) खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा खातेदारांचे प्रश्न समजून घेत स्वत: या प्रकरणी व्यक्तीगत लक्ष घालण्याचे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी शिवसेना खा. वायकर यांना दिले.
पी. एम. सी बँकेने एच.डी.आय.एलला 6 हजार कोटींचे कर्ज दिले. यासाठी 25 हजार बोगस खाती उघडण्यात आली. या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर आर. बी. आय ने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. यामुळे या बँकेतील खातेदार, सहकारी पतसंस्था व सोसायट्या, नागरी सहकारी बँका यांना स्वतः चे हक्काचे पैसे बँकेतून काढताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्या बरोबरच खातेदारांना दिलासा देण्यासाठी खा. वायकर यांनी तत्कालीन 21 ऑक्टोबर 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्त मंत्री निर्मला सीताराम, आर.बी.आय चे गव्हर्नर यांना पत्र पाठवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र शासनातील संबंधीत खात्यातील मंत्री यांना देखील पत्र पाठवले होते.
या बँकेतील 5 लाखापेक्षा कमी रक्कम असणाऱ्या सुमारे 8,61,983 वैयक्तीक खातेदारांना रुपये 2187.4 कोटी, 8282 संस्थाना 54.33 कोटी. अशा एकूण 8,70,265 खातेदारांना 2241.7 कोटी रुपयांचे वाटप. करण्यात आले. 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम खात्यात असलेल्या सुमारे वैयक्तीक 36,823 जणांना मिळून रुपये 5,716 कोटी व 2825 संस्थाना रुपये 2769 कोटी असे एकूण 39648 खातेदारक मिळून रुपये 8485 कोटी इतकी रक्कम देणे बाकी आहे.
परंतु अद्यापही उर्वरीत खातेदारांना दिलासा न मिळाल्याने खासदार वायकर यांनी संसदेच्या बजेट अधीवेशनात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत खातेदारांना दिलासा देण्यासाठी याकडे लक्ष यावे, असे निवेदन देऊन चर्चा केली. या प्रश्नी लक्ष घालण्यात येईल असे आश्वासन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी खासदार वायकर यांना दिले.